file photo

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ५ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (5 State Assembly Elections) ३ राज्यात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांचे टीका करण्याचे सत्र सुरु झाले आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

परभणीमधील भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आणि इतर काही जणांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement

याचेच औचित्य साधून शरद पवार बोलत होते. भाजप (BJP) एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष आहे.

आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात (Politics) चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात.

पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात असे म्हणत पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

Advertisement

आज लोक हळुहळु या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) चित्र पाहिले तर १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही.

पण आज एक दिवस असा जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही (Goa) हे चित्र दिसायला लागले आहे असेही बोलताना शरद पवार म्हणाले.

Advertisement