पुणे – “आताच एक आमच्या भावकीतील जेजुरीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं मी आता मी बाहेर फिरू नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो… कुठायत ते? आहेत का? कुणी सांगितलं म्हातारा झालो? तुम्ही काय बघितलं?’ असं भन्नाट विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Shrad Pawar) यांनी सोमवारी पुरंदर (Purandar) तालुक्यात आहे. सध्या त्यांचं हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे.

झालं असं की.., शरद पवार (Shrad Pawar) यांनी नुकतंच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी परींचे गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा कार्यालयाला भेट दिली.

या वेळी एका वयोवृद्ध कार्यकर्त्याने ‘साहेब तब्येतीची काळजी घ्या, बाहेर फिरू नका, एकाच जागेवरून रिमोट फिरवा, असा काळजी करणारा सल्ला दिला. त्यावर शरद पवार यांनी गमतीने ‘मी काय म्हातारा झालो का?’ असे गमतीने म्हटल्यावर हशा पिकला.

शरद पवार म्हणाले, पुरंदरमधील लोकांनी मला खूप प्रेम दिले. येथील लोक आधी गिरणी कामगार म्हणून जायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. शेतीचे प्रश्न सुटले नव्हते म्हणून सन्मानाने जगण्यासाठी पुरंदरमधील लोकांनी विविध व्यवसाय केले.

आता इथे लोक शेती करू लागले आहेत. व्यवसाय करू लागले आहेत. आधी लोकांना भेटायचं म्हटलं तर रोजगार हमीची काम सुरू करा अशी मागणी व्हायची. आता कारखान्याची मागणी करीत आहेत.

दरम्यान यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही.

राज्यातील नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारला माहिती देणार. पुरंदर तालुक्याचं चित्र बदलत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मी आलो तुम्ही कधी मला मोकळ्या हाताने पाठवलं नाही. तुमची साथ प्रत्येक निवडणुकीत लाभली, असं ते म्हणाले.