The Union Minister for Agriculture and Food Processing Industries, Shri Sharad Pawar addressing at the launch of the Sahana Group’s New Marathi Chanel “Jai Maharashtra”, in Mumbai on April 27, 2013.

Maharashtra News:पुण्यासाठी नियोजित करण्यात आलेले पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या जागेला पुरंदरमधील सात दहा गावांनी विरोध केला होता. याबाबत राज्य सरकारशी बोलल्यानंतर सरकारने आम्हाला दुसरी जागा द्यावी, असे सांगितले.

त्यानुसार दुसरी जागा दाखवून दिल्लीला बैठक घेतली. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या उपमुख्यमंत्र्यांनी नव्या जागेत विमानतळ होणार नसल्याचे जाहीर करून टाकले. तुमच्या हातात सत्ता आली, तुम्ही काय करायचे ते करा.

एकदा कुठेतरी विमानतळ करा आणि पुरंदरचा विकास करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांशी पवार यांनी सोमवारी संवाद साधला.

त्यावेळी विमानतळाचा विषय निघाल्यानंतर बोलताना पवार म्हणाले की, मला या सरकारचे नेमके काय चालले आहे, तेच समजत नाही. आधी जो निर्णय झाला त्याला सात दहा गावांनी विरोध केला,

पण त्यानंतर आम्ही सरकारशी बोललो. सरकारने आम्हाला सांगितले, दुसरी जागा द्या. दुसरी जागा दाखवली, त्यासाठी दिल्लीला बैठक बोलावली. काहीतरी निर्णय होण्याची अपेक्षा होती, तेवढ्यात राज्यातील सरकार बदलले.

नव्या उपमुख्यमंत्र्यांनी विमानतळ नव्या जागेत होणार नसल्याचे सांगून टाकले. त्याची चर्चा करायचे कारण नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही काय करायचे ते करा, पण एकदा कुठेतरी विमानतळ करून पुरंदरचा विकास करा. हा प्रश्न केवळ पुरंदरचा नसून पुणे जिल्ह्याचा आहे.