Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

शरद पवारांच्या जिवलग सहकाऱ्याचे निधन !

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत जिवलग सहकारी मित्र जगन्नाथराव मारुतीराव मोरे उर्फ ज.मा.मोरे यांनी बुधवारी ( दि.६ ) सकाळी सहा वाजता पुणे येथील खासगी रुग्णालयात वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात भारत आणि संजय अशी दोन मुले व सुन कल्पना भारत मोरे या माजी ग्रामपंचायत सदस्या आणि समीर,रवी ही नातवंडे असा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ते परिचित होते.

‘जमा आप्पा’ म्हणून त्यांना आदराने संबोधत असत. शरद पवार व जमा मोरे यांचे फार घनिष्ट मित्रत्व होते. पवारांचे ४६ वर्षाचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. जमा मोरे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती.

Advertisement

तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच इंदापूर तालुका पंचायत समितीच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच दहा वर्ष सभापतीपदी (१ मे १९६२ ते ५ ऑगस्ट १९७२) कार्यरत होते. सन 1975 सालापासून पवार आणि मोरे यांचे संबंध आजपर्यंत टिकून होते.

जेव्हा जेव्हा शरद पवार हे निमगाव केतकीवरुन पुढे कुठेही जात असत तेव्हा ते ‘जमा आप्पा’ यांना भेटल्याशिवाय जात नव्हते. जमा आप्पा यांनी निमगाव केतकी मध्ये शरद पवार व गोविंदराव आदिक यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती.

आजही निवडणुकीच्या रणधुमाळीत या प्रसंगाची चर्चा होते. मोरे यांनी तीन वेळा इंदापुर विधानसभा निवडणूक लढवली होती .मात्र ,काही मतांनी पराभूत व्हावे लागले होते. पवार यांनी स्थापन केलेल्या एस काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Advertisement

इंदापूर तालुका पंचायत समितीचे सन ६२ ते ७२ दहा वर्ष सभापती म्हणून काम केले होते. त्यांच्या कारकिर्दीत गावासह तालुक्यात अनेक विकासकामे झाली. पवार कुटुंबाशी त्यांचे अंत्यत जिव्हाळ्याचे संबध होते.

शरद पवारांकडून श्रध्दांजली अर्पण :- ”इंदापुर तालुक्यातील माझे धडाडीचे निष्ठावान सहकारी ज. मा.मोरे यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. जमांच्या शोकाकुल कुटुबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.”

Advertisement
Leave a comment