मुंबई : ड्रग्ज प्रकरणावेळी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) चांगलाच प्रकाश झोतात आला होता. त्यावेळी एनसीबी ने आर्यन खान याला अटक करण्यात आली होती.

आर्यन खान ला जमीन मंजूर झाल्यानंतर तो कुठेही सार्वजनिक ठिकाणी फिरत नसल्याचे दिसत होते. तो पहिल्यांदाच आयपीएलच्या (ipl) मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Auction Live) दिसून आला आहे.

ड्रग्ज (Drugs) प्रकरणानंतर पहिल्यांदाच आर्यन खान सार्वजनिक ठिकाणी दिसल्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या. चाहत्यांकडून त्याचे फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात आले आहेत.

Advertisement

आर्यांना खान आणि त्याची बहीण सुहाना खान हे दोघे २०२२ च्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये आले आहेत. दोघांनीही २०२२ च्या आयपीएल मेगा ऑक्शनला हजेरी लावली आहे.

अभिनेता शाहरूख खान कोलकाता नाइट राइडर्सचा (KKR) मालक आहे. अभिनेता शाहरुख खान मेगा ऑक्शनला गैरहजर असल्यामुळे त्याचा मुलगा आर्यन आणि सुहाना उपस्थित आहेत.

शाहरुख खानने आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाइट राइडर्सची जबाबदारी आर्यन खानकडे दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement

आर्यन खान चा फोटो सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या फोटोवर खूप कमेंट येत आहेत. एका चाहत्याने तर चक्क शेर का बच्चा आ गया असे म्हंटले आहे.

तर दुसऱ्या चाहत्याने “इतक्या दिवसानंतर आर्यनला पाहून अधिक आनंद झाला आहे असे म्हंटले आहे. वो वापस आ गया हे असेही अनेक चाहत्यांनी म्हंटले आहे.

Advertisement