काँग्रेस स्वबळाचा नारा सोडायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र शिवसेनेची साथ सोडणार नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच काँग्रेस शेवटपर्यंत स्वबळावर ठाम राहिली, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल, असे सांगून काँग्रेसवर दबाव वाढविला आहे.

त्या वेळी सगळे एकत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या घोषणांवर टोला लगावल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सूर काहीसा मवाळ झाला आहे. त्यात आज जयंत पाटील यांनी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस आता जरी स्वबळावर बोलत असली तर परिस्थिती येईल, त्यावेळी सगळे आम्ही एकत्र लढू असं आम्हाला वाटतं आहे, असंही ते या वेळी म्हणाले.

Advertisement

आघाडी तुट्याच्या मताचे सरनाईक नाहीत

प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत बोलताना ते म्हणाले, की सरनाईक हे आघाडी टिकावी या मताचे आहेत. हे मी अनेकवेळा खासगीत ही ऐकले आहे; पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोणत्या विषयावर पत्र लिहिलं आहे हे मला माहित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी तुटावी असा सरनाईक यांचा काही भाव असेल असे वाटत नाही.

शिवसेना-राष्ट्रवादीत वाद नाही

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट येणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये काही वाद आहे, अशी परिस्थिती नाही, असे ते म्हणाले.

 

Advertisement