विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेनेच्या ज्या नेत्यानं भाजपला नामोहरम करून, १२ आमदारांना घरी बसविलं, त्या नेत्याचीच आता विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची व्यूहनीती आखली जात आहे.

तीनही पक्षांचं एकमत

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकवायचे असेल, तर भास्कर जाधव यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यावर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.

शिवसेनेकडील वनमंत्रिपद काँग्रेसला सोडून काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला द्यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जाधव यांच्या गळ्यात लवकरच विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

जाधव यांचं महत्व अधोरेखित

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले. पावसाळी अधिवेशनाला सामोरे जाण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये चिंतेचे वातावरण होते.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी केली होती. अधिवेशनात एक दिवस अगोदर कॅबिनेटची बैठक झाली.

त्यात भास्कर जाधव यांना तालिका समितीचे अध्यक्ष करून अधिवेशनाला सामोरे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला.

Advertisement

मागील अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा आमदार भास्कर जाधव यांनीच सरकारची बाजू मांडली होती.

त्यामुळे याही अधिवेशनात भास्कर जाधव यांना अध्यक्ष करण्यावर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाले.

गाजविले दोन्ही दिवस

अध्यक्ष म्हणून काम करताना जाधव यांनी दोन्ही दिवस गाजवले. 20 हजार कोटीचे पुरवणी बजेट मंजूर केले.

Advertisement

सभागृहात गोंधळ घालणा-या आणि तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचे त्यांनी निलंबित केले.

नऊ विधेयके मंजूर केली. विरोधीपक्ष सभागृहात नाही म्हणून कोणताही कायदा मंजूर होणार नाही.

संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सभागृहात कायद्याची माहिती द्यावी, नव्या सदस्यांसह सर्वांना त्याची माहिती होईल. नंतरच तो कायदा मंजूर केला जाईल, अशी अट त्यांनी सरकारसमोर ठेवली होती.

Advertisement