मुंबई : शिवाजी पार्क (Shivaji Park) हे मुलांसाठी खेळण्याचे मैदान आहे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार तसेच स्मृतिस्थळ निर्माण करू नये, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) शिवाजी पार्क परिसरातील तळे रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी अॅड. प्रकाश सालसिंगिकर यांच्यामार्फत दाखल केली आहे.

शिवाजी पार्क मुंबईची (Mumbai) ओळख असलेले ठिकाण आहे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शवणारे तसेच यापुढे स्मृतिस्थळ बनविण्यास मनाई करावी अशी जनहित याचिका (PIL) शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल करण्यात आली आहे.

सदर याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, या पार्कच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात मुले खेळत असतात. हे मैदान (Ground) पहिल्यापासूनच दादरमधील (Dadar) मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Advertisement

त्यामुळे या ठिकाणी फक्त मुलांना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध रहावे, इतर कुठल्याही कामाकरीता मैदान उपलब्ध करून देऊ नये. अशी याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाढवानिमित्त होणारा मेळावा, 26 जानेवारी अशा कार्यक्रमाला अनुमती देण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, नौदल दिन, 1 मे महाराष्ट्र दिवस असे कार्यक्रम साजरे होतात.

मात्र हे दिवस वगळता इतर ३० दिवस हे मैदान खेळण्यासाठी वापरले जाईल. हे मैदान खेळण्यासाठी असल्यामुळे हे इतर कुठलाही गोष्टींसाठी उपलब्ध करून देण्यात येऊ नये, या मागणीसाठी ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Advertisement