Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

शिवाजीनगर बसस्थानक पुढच्या वर्षी सुरू होणार

पुणेः मेट्रो स्थानकाच्या कामामुळे वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आलेले शिवाजीनगर बसस्थानक पुढच्या वर्षी पुन्हा शिवाजीनगरला स्थलांतरित होईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.

एसटीला हवी पूर्वीची जागा :- शिवाजीनगर स्थानकाजवळ सुरू असलेल्या ‘मेट्रो मल्टीमोडल’ हबचे काम जुलै २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर एसटीच्या जागेवर काही महिन्यात नवीन, अत्याधुनिक डेपो बांधण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या ठिकाणी एसटी, मेट्रो आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानक एकत्रित असल्याने ‘मल्टीमोडल हब’ बांधण्यात येत आहे. त्याचे काम आता सुरू आहे; मात्र या ‘हब’चा एसटी भाग असणार नाही. मेट्रोसाठी आवश्यक जागा वळगता, एसटीने उर्वरित जागा पुन्हा ताब्यात घेण्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली होती.

Advertisement

अद्ययावत बसस्थानक उभारणार :- शिवाजीनगर येथे मेट्रो आणि एसटीचा एकत्रित प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला लागूनच एसटीच्या स्थानकाची जागा आहे. मेट्रोचे सध्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एसटीची जागा पुन्हा जाब्यात घेऊन त्या ठिकाणी अद्ययावत स्थानक उभे केले जाणार आहे, असे परब यांनी सांगितले.

प्रवाशांना सुविधा देण्याची सूचना :- परब यांनी एसटीच्या वाकडेवाडी येथील बसस्थानकाची पाहणी केली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, बसस्थानक आणि बसमध्ये स्वच्छता राखावी आदी सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

Advertisement
Leave a comment