पुणे – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या म्हणून शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.

Advertisement

मात्र, आता सेना कार्यालयांकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. सामनामध्ये आलेली बातमी अनावधानाने छापण्यात आली असून, आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते म्हणून पक्षात कार्यरत असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.

त्यामुळे शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना पक्षातच असून, सकाळ पासूनआलेल्या अफवांना आता शिवसेनेकडून पूर्ण विराम देण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत 40 आमदारांचे समर्थन मिळवले. गुवाहाटीला आमदारांना घेऊन गेल्यानंतर शिंदे यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिल.

Advertisement

बंड यशस्वी करत शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला होता, यातच आढळराव पाटील यांनी देखील शिंदे यांच्या विजयाचे ट्विट केले होते.

आढळराव पाटील यांनी केलेलं ट्विट –

Advertisement

‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असा आशय आणि मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतचे छायाचित्र आढळरावांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते.