आंबेगाव – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या म्हणून शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.

मात्र, काल सेना कार्यालयांकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. सामनामध्ये आलेली बातमी अनावधानाने छापण्यात आली असून, आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते म्हणून पक्षात कार्यरत असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.

Advertisement

दरम्यान, काल पासून सुरु असलेल्या या राजकीय घडामोळींवर स्वतः शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी आपलं व्यक्त केलं आहे.

तसेच,  एका मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनाची पोस्ट केली, हा काय माझा गुन्हा, आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होत होते.

Advertisement

शिवाजीराव आढळराव पाटील नक्की काय म्हणाले, “एका मुख्यमंत्र्याच्या अभिनंदनाची पोस्ट केली, हा काय माझा गुन्हा, आहे का, असा सवाल करत सकाळी अनेकांचे मला फोन आले,

मात्र माझा विश्वास बसेना की माझी हकालपट्टी शिवसेना (Shivsena) पक्षाने केली. मी पेपर वाचल्यानंतर मला समजले मला शॉक बसला की काय बोलावे आणि काय प्रतिक्रिया द्यावी,

अशी खंत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

काल रात्री साडे 10 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष माझे फोनवर बोलणे झाले. माझ्या मतदारसंघातील अनेक जण आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटायला येणार आहेत.

मी ही जाणार होतो, मात्र माझ्याकडे आज जनता दरबार असतो, म्हणून मी गेलो नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून अभिनंदन केल्याची पोस्ट केली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटले. असं ते म्हणाले.

तसेच, की जनतेने आणि शिवसेनेने मला मोठ केले आहे. मी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केल्यापासून अफवा आहे की मी भाजपामध्ये जाणार.

Advertisement

मात्र मी शिवसेनेसोबत प्रामाणिक आहेच आणि राहणार. दोन दिवस विचार करून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे आढळराव (Shivajirao Adhalarao Patil) म्हणाले आहेत.