मुंबई : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवभोजन थाळी (Shivbhojan Plate) योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली आहे. यामध्ये शिवभोजनच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे देखील भुजबळ म्हणाले.

शिवभोजन थाळी या योजनेसंदर्भात मंत्रालयातील दालनात (Hall of the Ministry) आढावा बैठक झाली आहे. यामध्ये शिवभोजन केंद्रांबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. म्हणून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या संकल्पनेतून,राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिवभोजन ही योजना २६ जानेवारी २०२० सुरु करण्यात आली आहे.

Advertisement

आतापर्यंत ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुमारे ८ कोटी ३४ लाख ९५ हजार ८५७ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. सध्या राज्यात १५२१ शिवभोजन केंद्र आहेत.

टाळेबंदीच्या कालावधीत अडीच कोटी शिवभोजन थाळयांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही (CCTV) बसविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे अशा सूचनाही अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Advertisement