जुन्नर – महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच जन्मस्थान असलेल्या ‘शिवनेरी किल्ल्यावर’ (Shivneri Fort) एक धक्कादाय प्रकार घडला असून, या घटनेमुळे पर्यटकांच्या आणि शिवभक्तांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले शिवनेरीच्या (Shivneri Fort) परवानगी दरवाजाजवळ माकडाने हल्ला (monkey attack) केल्याने सहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास एक कुटुंब किल्ल्यावरून (Shivneri Fort) परतत असताना हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अध्यात्म अशोक गायकवाड (वय ६, रा. विक्रोळी, मुंबई) असे जखमी बालकाचे नाव आहे. त्याच्या डाव्या हातावर माकडाने चावा घेतला. माकडाच्या दातामुळे खोल जखम झाली असून, हातावर चार टाके घालावे लागले.

ही घटना घडताच पुरातत्व विभागाचे कर्मचारी गोकूळ दाभाडे यांनी जखमी बालकाला जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर आवश्यक उपचार आणि लस देण्यात आली.

मात्र, रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने त्याला मंचर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी बालकाची आई त्यांच्या माहेरी पांगरी माथा येथे सुटीला आल्या होत्या. मुलाला किल्ला दाखविण्यासाठी त्या भावासोबत किल्यावर गेल्या.

दरम्यान, किल्ल्यावरून परतत असताना पायरीमार्गावरून एका पर्यटकाने लहान कुत्रे चालवले होते. त्याला पाहून माकड अचानक पळत आले आणि किल्ला उतरत असलेल्या अध्यात्मवर हल्ला करून त्याचा चावा घेतला.

जुन्नर रेस्क्यू टीमच्या राजकुमार चव्हाण आणि आदित्य आचार्य यांनी जखमी बालकाच्या कुटुंबीयांना मदत केली असून, सध्या या बालकाची तब्येत ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. अनेक पर्यटक आणि शिवभक्त रोज या किल्ल्याला भेट देण्यास येत असतात.