पुणे : येथील पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad city) २४ वर्षीय तरुणीने (Young lady) इमारतीवरून उडी मारत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पैसे (Money) नसल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे.
नम्रता गोकुळ वसईकर (Namrata gokul Vasaikar) (वय २४) असे उच्चशिक्षित (Highly educated) तरुणीचे नाव आहे.
जावा लँग्वेज (Java language) शिकण्यासाठी ३० हजार नसल्याने आत्महत्या केली आहे. नम्रताचे बिटेक शिक्षण (B-Tech education) पूर्ण झाले होते.
नम्रताला चांगली नोकरी (Job) लागेल या आशेने सर्व कुटुंब (Family) शहरात स्थायिक झाले होते. नम्रताच्या भावाला सहा महिन्यापूर्वीच नोकरी लागली आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, नम्रता ही अत्यंत हुशार मुलगी होती. धुळे (Dhule) येथे तिचे बिटेक शिक्षण झाले होते. नम्रताच्या भावाला नोकरी लागली होती.
नम्रतालादेखील हिंजवडीत (Hinjawadi) चांगली नोकरी लागेल या आशेवर सर्व कुटुंब धुळे येथून वाकड येथे स्थायिक झाले होते.
वडील हे वाकड चौकात बूट पॉलिश करण्याचे काम करतात. नम्रताला चांगली नोकरी लागण्यासाठी ऍडव्हान्स कोर्स करायचा होता. त्याची फी ३० हजार होती, याबाबत तिने आई वडिलांना माहिती दिली होती.
आई- वडिलांनी नम्रताला काही दिवस थांबण्यास सांगितले होते. आई-वडिलांनी पैसे आल्यावर हा कोर्स कर असे नम्रताला सांगितले होते. मात्र, पैसे जमा करून देण्याअगोदरच नम्रताने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.