पुणे : येथील गोरख नानाभाऊ शेलार (Gorakh Nanabhau Shelar) या २४ वर्षीय जवानाने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. हा जवान भारतीय सैन्य दलातील (Indian Army)भरती नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये (AAFMC) कार्यरत होता.

गोरख शेलार यांनी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या (Sucide) केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पत्नी अश्वीनी पाटील, युवराज पाटील, संगिता पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. नंदुरबार) यांच्यावर पुण्यातील (Pune) वानवडी पोलिसांत (Wanwadi police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

जवानाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार त्याने तक्रारीत सांगितले की,१६ फेब्रुवारी २०२१ रोजी माझ्या भावाचे लग्न झाले होते.

लग्न झाल्यापासून माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील (Ashwini Yuvraj Patil) हिने ६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार मानसिक त्रास दिला आहे.

तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो आणि तुझ्यासह तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो. नाहीतर सोडचिठ्ठी दे, आणि १५ लाख रुपये दे, असे वारंवार बोलून माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास त्यांनी दिला होता.

Advertisement

तसेच याच त्रासाला कंटाळून गोरख याने आत्महत्या केली आहे. माझ्या भावाला आत्म्यहत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे त्याची पत्नी अश्विनी, सासरा युवराज पाटील, सासू संगिता पाटील, मेव्हणा योगेश पाटील, मेव्हणी भाग्यश्री पाटील हे कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. अशी तक्रार जवानाच्या भावाने केली आहे.