water in glass

पुणे : शहरात एक धक्कादायक (shocking) घटना घडली आहे. पुण्यात (Pune) डेअरीच्या (Dairy) बॉयलरची (Boilar) सफाई करताना ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये १ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे.

डेअरीतील निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. साफसफाई करत असताना चौघांच्या अंगावर उकळते पाणी (Boiling water) पडले त्यामुळे ही घटना घडली आहे.

मुकेश रामलाई कश्यप (वय 30) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय 26), राहुल संतोष कुमार माथूर (वय 18), इसाक अकबर कोतवाल (वय 45) हे कामगार उकळते पाणी पडल्यामळे गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisement

सहारा दूध डेअरीतील (Sahara Milk Dairy) निष्काळजीपणा या कामगारांच्या जिवावर बेतला आहे. बॉयलर साफ करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे डेअरीतील इतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सहारा डेअरीतील ऑपरेटर (Operator at Sahara Dairy) अब्दुल गफार अब्दुल रशीद मुल्ला आणि व्यवस्थापक मोहितकुमार राजबहादूर सिंग यांच्यावर या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge police station) याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर (Assistant Inspector of Police Suresh Yamgar) यांनी या बाबत तक्रार दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement