पिंपरी : आपटी बॉम्ब (Apti bomb) खेळताना एका 4 वर्षीय (4 Years Old Girl) मुलीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील दिघी (Dighi) परिसरात झालेल्या या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेत राधा (Radha) या मुलीचा मृत्यू झाला असून आरती (Arti) आणि राजू (Raju) नावाची लहान मुले जखमी झाली आहेत.

सदर घटनेची माहिती पोलिसांना (Police) मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळावर धाव घेत घटना स्थळाची पाहणी केली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी- चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) दिघी येथे आपटी बॉम्ब फुटल्याने एका लहान मुलीची मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन लहान मुले जखमी झाली आहेत.

राजस्थान (Rajsthan) येथून दिघी येथे मृत मुलीचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी आले असून, कुटुंबीय जनावरांच्या गोठ्यात काम करतात.घटनेच्या दरम्यान मृत मुलगी व इतर मुले खेळत होती.

खेळत असताना त्यांना कचऱ्यात बॉल (Ball) सदृश्य वस्तू दिसल्या. त्यानंतर मुलीनी त्या वस्तू घरी आणत गोठयात ठेवल्या. आज घटनेच्या दरम्यान आज सकाळी दूध घेऊन मुलांचे वडील बाहेर गेले होते.

Advertisement

त्याच दरम्यान मुले त्या बॉल सदृश्य वस्तूबरोबर खेळत असताना तो बॉल (आपटी बॉम्ब) खाली पडला आणि फुटला यामध्ये राधा नावाची चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.

तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. तसेच इतर दोन मुले जखमी झाली आहेत.

Advertisement