पुणे : शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या (ncp carporator) मुलावर बलात्काराचा (Rape) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. भाजी विकणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu Gaikwad) यांच्या मुलावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर गायकवाड (Sameer Gaikwad) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुण्यातील एक भाजी विक्रेत्या महिलेने (Woman selling vegetables) मुंढवा पोलिस ठाण्यात(mundhwa police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी समीर गायकवाड हा मुंढवा परिसरातील (Mundhwa area) महिलेकडे भाजी घेण्यासाठी जात असायचा. त्यातून त्यांची ओळख झाली. दीड वर्षांपूर्वी महिला घरी एकटी असताना समीर याने महिलेवर अत्याचार केला.
याबाबत जर तू कोणाला काही सांगितले, तर तुझ्या नवर्याला आणि मुलांना मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली. त्यामुळे महिलेने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही.
त्यानंतर 17 डिसेंबर रोजी समीर याने पुन्हा महिलेवर तिच्या घरात बलात्कार केला. हा प्रकार महिलेच्या पतीने आणि मुलाने पाहिला. त्यामुळे आरोपीने त्या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
महिलेने समीर गायकवाड विरोधात बलात्काराची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले आहे.