पुणे : शहरातील हिंजवडीत (Hinjwadi) एका तरुणाने विद्युत डीपीवर (Electrical DP) चढत आत्महत्या (Sucide) करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

तरुणाला उपचारासाठी (Treatment) जवळच्या खाजगी रुग्णालयात (Private hospital) दाखल करण्यात आले आहे. तिथे असणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानामुळे (Firefighters) या तरुणाचे प्राण वाचले आहेत.

ही घटना सोमवारी दि.२७ दुपारच्या सुमारास घडली आहे. हिंजवडी माण रस्त्यावर (Hinjawadi Maan Road) असलेल्या विद्युत डीपीवर हा तरुण चढला होता.

Advertisement

हा तरुण अत्यंत वर्दळ असणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत डीपीवर चढला होता. त्यामुळे तिथे असणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

तिथल्या ग्रामस्थांना त्वरित एमएसईबी च्या (MSEB) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या विद्युत डीपीचा विद्युत पुरवठा खंडित करायला सांगितला.

ग्रामस्थांच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना कळवताच त्यांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

Advertisement

अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला खाली येण्याची विनंती केली. मात्र तरुण ऐकण्यास तयार नव्हता. तो खाली उडी मारण्याचा प्रयत्न केट होता.

अग्निशमन दलाच्या जवानांनी लोखंडी सीडी च्या सहाय्याने तरुणाला सुखरूप खाली घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Advertisement