पुणे : शहरामधील पिंपरीतील (Pimpri) एका बांधकाम व्यावसायिकाने (Builders) कट रचून जागा हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बाधंकाम व्यावसायिकासह ५ जणांवर न्यायालयाच्या (Court) आदेशानुसार पोलिसांनी (Police) गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

कागदपत्रांमध्ये (Documents) खोटा रस्ता दाखवून बांधकाम व्यावसायिकाने बांधकामाचा आराखडा (Outline) मंजूर केला आणि जागा हडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश आदेश आहे.

Advertisement

हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) राजेंद्र बालनाथ भुंडे (Rajendra Balnath Bhunde) (वय ४६ रा. कोथरूड) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

एस. आर. ए. प्रमोटर्स आणि डेव्हलोपर्स (SRA Promoters and developers) याचे हिस्सेदार शामकांत जगन्नाथ शेंडे, मुकेश मनोहर येवले, सुनील पोपटलाल नहार, सचिन पोपटलाल नहार, श्रीमती सीमा गोहाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने सोपवलेल्या मालमतेची आरोपींची कट रचत अफरातफर केली आहे. फिर्यादी यांना फसवून (Cheating) त्यांच्याकडून जमात घेण्यात आली. त्यांना विश्वासात घेऊन खोटा आराखडा बनवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

आरोपींनी तक्रारदार यांचा ७/१२ संदर्भात २०१९ च्या आराखड्यात खोटे दस्तावेज दाखवले आणि जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.