पिंपरी : पिंपरी मधील नेहरूनगर(pimpri neharunagar) परिसरात स्वयंपाकासाठी उशीर झाल्याने पतीने (Husband) पीडित पत्नीला (Wife) शिवीगाळ करत मारहाण केली, व तिच्या अंगावर डिझेल (Diesel) ओतून तिला पेटवले आहे.

या घटनेचा पोलिसांनी (Police) तपास करत आरोपी पती राहुल पारधेला (Rahul Pardhe) अटक केली आहे. यामध्ये गुन्हेगाराला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (pimpri police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपीने पत्नीवर संशय घेत रागाच्या भरात हे कृत्य केले आहे. घटनेवेळी शेजारी राहणाऱ्यांना या महिलेचा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने त्यांनी घटनास्थळावर जाऊन तिला वाचवले आहे.

Advertisement

या घटनेत पीडित पत्नी 35 ते 40 टक्के भाजली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली असून न्यायालयाने (court) चार दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे.

या घटनेमुळे पिंपरी परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या ठिकाणी दिवसोंदिवस अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पिंपरी व आसपास परिसरात राहणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाले आहे.

Advertisement