पुणे : राज्यात पेपरफुटीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. आता पोलीस भरतीबाबत (Police recruitment) धक्कादायक (Shocking) माहिती समोर येत आहे. पोलीस भरती आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

म्हाडा पेपरफुटी प्रकरणी (Mhada Paper leak Scham) अटकेत प्रीतिश देशमुखच्या (Pritish Deshmukh) याच्या घरी पोलिसांना पोलीस भरतीबाबत काही पुरावे मिळाले आहेत.

त्यामुळे पोलीस भरतीही संशयाच्या कचाट्यात आली आहे. प्रीतिश देशमुखच्या (Pritish Deshmukh) याच्या घरी पोलिसांना चौकशी दरम्यान पोलीस भरतीची (Police Bharati Hall Ticket) ओळखपत्रं सापडली आहेत.

Advertisement

टीईटी परीक्षेतील (TET) चौकशी करताना हा गैर प्रकार उघडकीस आला आहे. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घरातून आता 2019 व 2021 सालच्या पोलीस भरती परीक्षेतील तीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रे पुणे पोलिसांना सापडली आहेत.

या आधी प्रीतिश देशमुखच्या घरात टीईटी परीक्षांची अपात्र परीक्षार्थींची ओळखपत्रे, हॉल तिकीट सापडले होते. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीने राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आदी ठिकाणी पोलीस भरती परीक्षा घेतल्या आहेत.

Advertisement