file photo

पुणे : जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यात एक धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. शेळ्या अंगणात आल्याच्या रागातून एका ५० वर्षीय महिलेचा डोक्यात आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करत खून (Murder) करण्यात आला आहे.

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज (Karhavagaj) येथे ही घटना घडली आहे. गंगूबाई तात्याराम मोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात (Police Station) फिर्याद (Complaint) देण्यात आली आहे.

मृत महिला यांची सुन प्रमिला प्रमोद मोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची आणि शेजाऱ्यांनी भांडणे (Quarrel) झाली होती.

Advertisement

अंगणात शेळ्या गेल्यामुळे अडीच वर्षांपूर्वी तक्रारदार महिलेच्या शेजारी राहणारे भावकीतले किरण मोरे आणि तक्रारदार महिलेची सासू यांच्यात भांडणे झाली होती.

शेजारी असणाऱ्या नागरिकांनी त्यावेळीची भांडणे मिटवली होती. तेव्हापासून ही दोन्ही कुटुंबे एकमेकांशी बोलत नव्हती. रविवारी(दि. ९) दुपारी दीड वाजता फिर्यार्दीने पती प्रमोद, सासू गंगूबाई यांच्यासमवेत जेवण केले.

अर्ध्या तासाने पती प्रमोद हे बारामतीला कामावर निघून गेले. सासू गंगूबाई या नातू सार्थक व जीवन यांना सोबत घेत गप्पा मारण्यासाठी घराजवळील कांतीलाल मोरे यांच्या पत्राशेडजवळ गेल्या होत्या.

Advertisement

अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला. त्याने तेथे जात गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला.या घटनेत गंगूबाई या जमिनीवर कोसळल्या.

हा प्रकार पाहताच फिर्यादीने आरडाओरडा करीत धावत जात आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना बाजूला ढकलून देत गंगूबाई यांच्या छातीवर पुन्हा कुऱ्हाडीने वार केला.

तुझ्या सासूचा कसा काटा काढला, तु पुढे ये, तुझा पण काटा काढतो असे धमकावत तो हातातील कुहाड घेत तो फियादीच्या अंगावरही धावून गेला.

Advertisement

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते (Assistant Inspector of Police Mahesh Vidhate) यांनी ही माहिती दिली.