Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुण्यातील धक्कादायक घटना: म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन एवजी…

राज्यात सध्या कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आधीच कोरोनामुळे बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वाढत आहेत.

मात्र या बिकट अवस्थेत देखील काहीजण संकटात असलेल्या नागरिकांना आधार देण्याऐवजी त्यांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार शिरुर तालुक्यातील पाबळ येथे घडला.

येथील एका इसमाला म्युकरमायकोसिस या आजाराची बाधा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी एमंफोटेरीसिन बी या इंजेक्शनचा शोध घेण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे सदर इसमाच्या नातेवाईकांनी संबंधित इंजेक्शन बाबत सोशल मीडियावर माहिती घेतली असता नगर येथील एका ठिकाणी पांचाळ नामक इसमाकडे एमंफोटेरीसिन बी हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी ‘त्या’इसमाच्या मोबाईलवर संपर्क केला.

यावेळी चार हजार रुपये प्रमाणे तीस एमंफोटेरीसिन बी इंजेक्शन लागणार असल्याने त्यांना पन्नास टक्के रक्कम घ्यायची ठरले. त्यामुळे आजारी रुग्णाच्या नातेवाईकांनी सदर इसमाला त्याने दिलेल्या बँक खात्यावर साठ हजार रुपये पाठवले त्यांनतर दोन दिवस पांचाळ नामक इसमाने इंजेक्शन दिले नाही.

तसेच फोन देखील उचलला नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलिस नाईक प्रताप कांबळे हे करत आहेत.

Leave a comment