ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

धक्कादायक माहीती आली समोर! चितळेंकडे खंडणी मागणा-यांत शिक्षिका…

पुणेः दर्जा म्हणजे चितळे असे समीकरण पुणे-सांगलीत तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत त्यांच्याकडून वीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणे चांगलेच अंगलट आले असून चाैघांना पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्यात एका शिक्षिकेचाही समावेश आहे.

बदनामीची धमकी देत मागितली खंडणी :- अन्न व आैषध प्रशासन विभागाकडे तक्रार न करण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या चार जणांमध्ये एका शिक्षक महिलेचाही समावेश आहे.

महिला पुण्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. दुकान बंद करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांनी ही खंडणी मागितली होती.

तक्रारदार चितळे दूध वापरत नसल्याचे उघड :- शिक्षक असलेल्या पूनम परदेशी यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांच्यावर ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेलद्वारे आणि प्रत्यक्ष फोनद्वारे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ आढळला असल्याची तक्रार केली होती.

यासाठी तुमच्या विरोधात एफडीए व पोलिसांकडे तक्रार करते. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, नाहीतर तुमचे दुकान बंद करू, तुमची बदनामी करू, अशा धमक्या देत सुरुवातीला पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.

ही महिला चितळे दूधही वापरत नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना पकडण्यासाठी सापळा रचला. चितळे डेअरीवाले 5 लाख रुपये देण्यासाठी तयार झाल्याचे पाहून त्यांनी ही रक्कम वाढवून 20 लाखांवर नेली.

You might also like
2 li