पुणे : येथील हडपसर (Hadapsar) भागात धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या व्यक्तींकडून छळ करण्यात येत होता म्हणून एका विवाहीतेने आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या व्यक्तीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर येत आहे. पती, सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली सुनील माने (Vaishali Sunil Mane) (वय २८, रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वैशाली यांची आई मीनाबाई पवार (५५, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Advertisement

हडपसर पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सुनील माने, गंगूबाई माने, नागाबाई माने (रा. धारावी, मुंबई) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Crime) दाखल केला आला आहे.

२०१३ मध्ये वैशाली यांचा विवाह झाला होता. लवकर उठत नाही. शिवीगाळ आणि मारहाण केली होती. तिचा मानसिक छळ करण्यात आला. तिचा अंगावरील दागिने काढून घेण्यात आले. वैशाली ला घरातून बाहेर काढण्यात आले होते.

वैशालीला घरातून हाकलून दिल्यानंतर ती शेकरवस्ती हडपसर येथे माहेरी आली होती. त्या ठिकाणी तिने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपस करत आहे.

Advertisement