पुणे : जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरींग (Software Engineering) शिक्षण घेणाऱ्या २८ मुलींना विषबाधा (Poison) झाली आहे. त्यातील ६ मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

भोर तालुक्यातील खोपी गावात फ्लोरा इन्स्टिट्यूटमधील (Flora Institute) सॉफ्टवेअर इंजिनिअरींगच्या या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. या मुलींवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) उपचार सुरु आहेत.

या सर्व मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. २८ विद्यार्थिनींमधील ६ मुलींची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

या सर्व मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुलींनी रविवारी रात्री जेवण केल्यांनतर मुलींची तब्येत बिघडली.

नंतर हळूहळू आणखी विद्यार्थिनींची तब्येत बिगडल्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व मुलींच्या विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील डॉक्टर सर्व मुलींवर लक्ष ठेऊन आहेत.

Advertisement