मंत्रालयामध्ये बंदोबस्तासाठी आलेले जवान रात्रपाळीनंतर डोंगरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत आले होते. या ठिकाणी पुष्कळ सुधाकर शिंदे (वय 36) याने साडेनऊच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

सकाळी साडेनऊच्या सुमारास पुष्करने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने त्या ठिकाणी खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. या जवानाने स्वतःच्या रायफलनेच स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे.

जवानाच्या आत्महत्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आहे. व जे जे रुग्णालयात घेऊन गेले आहेत. मंत्रालयामध्ये एसआरपीएफ तुकडी 6 जानेवारीपासून बंदोबस्तासाठी तैनात आहे.

Advertisement

हे जवान आज मंत्रालय येथे रात्रपाळीनंतर डोंगरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत आले होते. तसेच हे जवान परिमंडळ 1 कार्यक्षेत्रात मंत्रालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर स्ट्रायकिंग क्रमांक 3 (एसआरपीएफ) ग्रुप क्रमांक 2, पुणे, डी कंपनी फ्लाटून क्रमांक 1) तैनात करण्यात आली होती.