तू माझ्याशी का बोलत नाही, मला का भेटता नाही असे विचारत एका व्यक्तीने पीडित तरुणीचा गळा दाबत तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Police)आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर (वय 22,चंदनगर) याला अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून पुणे -नगर रोडवर खुळवाडी(Pune nagar road) येथे अल्पवयीन तरुणीवर आरोपीने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.

ही पीडित मुलगी चंदननगर (Chandannagar) परिसरात राहते. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. सदर आरोपी हा त्याच परिसरात राहत असून तो पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता.

Advertisement

तरुणीला आरोपी ओळखत होता, मात्र तरुणी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संवाद करत नव्हती . त्याच्याशी बोलत नव्हती. तरुणीच्या अशा वागण्याचा राग आरोपीच्या मनात होता.

घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर अडवले. त्यानंतर तू माझ्याबरोबर का बोलत नाहीस , मला प्रतिसाद का देत नाही ? यावर तरुणीने त्याला नकार दिला.

तरुणीने दिलेल्या नकाराचा आरोपीला राग आला व त्यातूनच त्याने तरुणीचा गळा दाबला अन त्याच्या जवळच असलेला चाकूने तरुणीच्या छातीवर , पोटावर, पाठीवर सपासप वार केले.

Advertisement

या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून आरोपी तिथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीसानी जखमी तरुणीची भेट घेतली.

त्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन अधिक तपास करत आहेत.

Advertisement