पुणे : म्हाडा पेपरफुटीनंतर टीईटी (MahaTET) परीक्षेतही मोठा गैरप्रकार केल्याप्रकरणी तुकाराम सुपेंना (Tukaram Supe) अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) याबाबत चौकशी सुरु आहे.

या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. आता पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. अश्विन कुमार (Ashwin Kumar) आणि सुखदेव ढेरे (Sukhdev Dhere) ​या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

अश्विन कुमार (Ashwin Kumar) या आरोपीला बंगळुरूमधून (Bangalore) अटक करण्यात आली आहे. उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रे देणे असे आरोप अश्विन कुमार याच्यावर आहेत.

Advertisement

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची ५०० जणांचे निकाल बदलल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Commissioner Tukaram Supe) यांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून सुरुवातीला ९० लाखांचे तर नंतर २ कोटींचे घबाड पोलिसांनी जप्त केले आहे. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) ​यांनी दिली आह

Advertisement