पुणे : पती (Husband) पत्नीची (Wife) अनेक भांडणे (Quarrel) झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. ही भांडणे अनेक कारणावरून होत असतात.

पण पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchavd) शहरात एक चक्रावून सोडणारी पती पत्नीची भांडणे झाली आहेत.

पत्नीने स्वयंपाक (Cooking) नीट बनवला नाही म्हणून पतीने चक्क तिझा पाठीचा कडकडून चावा घेतला आहे. या चाव्यामुळे पत्नीच्या पाठीला जखम (Injuries) झाली आहे.

Advertisement

पत्नीने अखेर पोलीस ठाण्यात (Police Station) जात पतीविरोधात तक्रार (Complaint) दाखल केली आहे. पोलिसांनी (Police) पतीविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे. पोलिसांनी पतीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

आरोपी पतीला समज देत दोघा पती पत्नीची भांडणे मिटवली आहेत. भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) माहिती दिली आहे. दोघेही पती पत्नी उच्चशिक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

पत्नीने तक्रार दाखल करत असताना स्वयंपाक नीट झाला नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलीलादेखील मारहाण केली असे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

Advertisement

यावेळी त्याने मद्यपान (Alcoholism) केले होते. मारहाण करत असताना आरोपी पतीने रागाच्या भरात पाठीचा कडाडून चावा घेतला असेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला समज देत सोडून दिले आहे.