file photo

पुणे : शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) अधिकच वाढत चालले आहे. पुण्यामध्ये (Pune) अल्पवयीन मुलांनीच २० वर्षीय तरुणाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे.

अनिल राजेंद्र जाधव (Anil Rajendra Jadhav) (वय 20, रा. डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण अल्पवयीन मुलांना (Teenage boys) शिवीगाळ करुन त्यांच्याकडे सिगारेट व पेट्रोलसाठी जबरदस्तीने (Ragging) पैसे मागायचा.

मुलांनी पैसे न दिल्यास त्यांना मारहाण करायचा. हे वारंवार घडत असल्यामुळे अल्पवयीन मुलांनी रविवारी सायंकाळी कर्वेनगर (Karvenagar) येथे तरुणावर कोयत्याने वार करुन खुन केला आहे.

Advertisement

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Crime Branch police) याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हा त्याच्या बहिणीला सोडवायला लक्ष्मीनगर (Laxminagar) परिसरात आला होता.

त्याची बहीण हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करते. तो पुन्हा घरी जात असताना शक्ती चौकात आल्यावर ३ जणांनी त्याच्यावर अचानकपणे धारदार तलवारीने डोक्यावर आणि खांद्यावर वार केले.

त्यावेळी अनिल याने दुचाकी सोडून जाण्याचा प्रयत्न केला होता. काही अंतरावर तो धावतही गेला. हल्लेखोरांनी (Attacker) पाठलाग करत त्याच्यावर पुन्हा वार केले होते. अनिलचा जागीच मृत्यू (Death) झालाआहे.

Advertisement

या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुले रविवारी रात्री चांदणी चौक (Chandni Chowk) परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार राजेंद्र लांडगे (Police officer Rajendra Landage) यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने चांदणी चौकातुन दोघांना ताब्यात घेतले आहे.