file photo

पुणे : शहरात गुन्हगारीचे प्रमाण (Crime rate) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गुंडांच्या टोळ्या (Gangs of thugs) शहरात दहशत माजवणे, वाहनांची नासधूस करणे अशा प्रकारची कृत्ये करत असतात.

पुण्यातील बिबवेवाडी (Pune Bibavewadi) परिसरात अशीच एक घटना घडली आहे. वाढदिवशीच (Birth Day) एका टोळीतील तरुणाला संपवण्याचा कट आखण्यात आला होता. पण त्यासाठी हल्ला (Attack) करायला केल्यानंतर पळ काढलेल्या तरुणाने बदला घ्यायचे ठरवले.

ठरल्याप्रमाणे बदला घेण्यासाठी जेव्हा प्रतिहल्ला करण्यात आला, तेव्हा माजवण्यात आलेल्या दहशतीमुळे नागरिकांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि हे सगळे प्रकरण उघडकीस आले.

Advertisement

याप्रकरणी पोलिसांनी (Police) १२ तासांच्या आतमध्ये आरोपींना अटक केली आहे. दहशत माजविणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या टोळक्यातील तरुणांना मारण्यासाठी हे सर्वजण शेळके वस्तीमध्ये शिरले होते.

कशावरून पेटला वाद

दोन गटामध्ये भांडण सुरु होते. अमीर खान काकडे वस्तीत आणि सूरज व आकाश कोळी हे शेळके वस्तीत राहणारे तरुण आहेत. यांचे भांडण काही महिन्यापासून सुरू होते.

Advertisement

वाढदिवस साजरा करत असताना शेळके वस्तीतील सूरज कोळी आणि त्याचे साथीदार अमीरला मारण्यासाठी गेले. त्यामुळे अमीर आणि त्याचे मित्र स्वतःला वाचवण्यासाठी पळून गेले.

त्याच दिवशी रात्री उशिरा अमीर खान त्याच्या मित्रांना हत्यारांनिशी गेऊन सूरज आणि त्याच्या साथीदारांना मारण्यासाठी शेळके वस्तीत शिरले. पण घरं माहीत नसल्याने त्यांनी शेळके वस्तीतील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे (Bibwewadi Police Station) वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware) ​यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

Advertisement

ही कारवाई तक्रार केल्यापासूनच्या 12 तासांच्या आतच सर्व 12 जणांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर बाकी गुंडाना याचा आळा बसतोय का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.