पुणे – आंबेठाण गावातील (ambethan pune) लांडगे वस्तीवर गट नंबर 232 मध्ये एका खाजगी व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला असता त्यात, खेळता खेळता 3 भावडांचा दुर्दैवी बुडून मृत्यू (Children Dead) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार येथील जयकिशन दास यांचे कुटूंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. त्यांचे हे मृत्यू पावलेले (Children Dead) तीन अपत्य होते.

किशोर दास हे मूळ बिहार (Bihar) राज्यातील रहिवाशी आहेत. त्यांना एकूण चार अपत्य आहेत. त्यातील रोहित दास (वय -8), राकेश दास (वय -6), श्वेता दास (वय -4) असे मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.

एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने हा मोठा अनर्थ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी मदत कार्याची टीम आणि महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले. खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली.

त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तीन लहान भावंडे एकाच घरातील होती. दोन मुले आणि एक मुलगी यात मृत पावले आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील पुणे शहरातील सिंहगड रोड (Sinhgad Road) परिसरातील धायरी (Dhayari) इथं खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या शेत तळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू (boys drowned) झाला होता.

सुरज शरद सातपुते (वय 14) पुष्कर गणेश दातखिंडे (वय 13) दोघेही (रा. धायरी, नालंदा हायस्कुल शेजारी) अशी त्यांची नावे आहेत.