ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे संकेत फडणवीस केंद्रात मंत्री; शिवसेनेलाही विस्तारात संधी

गेल्या आठवड्यापासून राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्या दिल्ली भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

एका वाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री, महाराष्ट्रात ठाकरेच मुख्यमंत्री आणि शिवसेनच्या खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश अशी त्रिसूत्री ठरल्याचे सांगितले जाते.

मित्राला पुन्हा संधी

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची घटिका आता अगदी जवळ आली आहे. साधारणतः पुढील दोन दिवसांत निश्चित मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जाते आहे.

मोदी यांच्या विस्तारित टीममध्ये साधारणतः २० ते २१ नव्या नावांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जुना मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेलाही संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना-भाजपत कोणत्याही क्षणी युती

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्याही क्षणी युतीचा घोषणा होऊ शकते. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला मंत्रिपद दिले जाणार आहे.

तसेच राज्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. तर देवेंद्र फडणवीस केंद्रात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील.

तर भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील, असं वृत्त सूत्राच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. भाजपमधील सूत्रांनी या वृत्ताचं खंडण केलं असून केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील घडामोडीचा संबध नसल्याचं म्हटलं आहे.

फडणवीस यांची सावध भूमिका

फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. त्या वेळी केंद्रात जाणार का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली होती. फडणवीस म्हणाले होते, की भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतली तो अंतिम असेल.

त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णयाचा सन्मान केला जातो. पक्षाकडून मला विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ती जबाबदारी मी ताकदीनं निभावत आहे. मला वाटत नाही, दिल्लीत माझी गरज असेल; पण पक्षाचा निर्णय अंतिम असेल. ‘

 

You might also like
2 li