पुणे – प्रतापगड किल्ल्यावरील (sinhagad fort) अनधिकृत अतिक्रमण हटवल्यानंतर वन विभागाने पुण्यातील किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गडाचे सौंदर्य (Sihagad Fort) अबाधित राखण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता सिंहगडाचे पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत असलेल्या खादयपदार्थांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून टाकले आहे. अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय स्टॉल धारकांशी चर्चा करुन घेण्यात आला.

किल्ले सिंहगडावर (sinhagad fort) गेल्या काही वर्षापासून गडाच्या पार्किंगपासून ते माथ्यापर्यंत खादयपदार्थ स्टॉल धारकांनी विविध ठिकाणी प्लास्टिक पेपर्स वापरुन अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते.

अतिक्रमण धारकांना कायदेशीर पद्धतीने वन विभागाकडून सुरवातीला नोटीस देण्यात आल्या असून वन विभागामार्फत अवैध झोपड्या काढण्यात आल्या.

दरम्यान, गडावरील वनविभागाची कारवाई थंडावल्यानंतर गडावर फिरताना कोरोना काळापेक्षा भयानक परिस्थिती पहावयास मिळाली. उद्धवस्त झालेली हॉटेल, अस्तावस्त पडलेले साहित्य, अश्रूंची किनार.. असा सन्नाटा गडावर दिसून आला.

नेहमी गजबजलेला वाहनतळ आज रिकामा दिसत होता. तेथील चालक- मालक त्या पाडकाम केलेल्या ढिगाऱ्यात अस्तित्व शोधत होते. पण या पाच सहा व्यक्ती असून ही तेथे जिवंतपणा दिसत नव्हता.

अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय जमून बसलेल्या नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं यावेळी दिसून आलं होत. दरम्यान, आता अतिक्रमण काढल्यानंतर पार्किंगची देखील जागा विस्तरणार आहे.

तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. परिणामी शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल. असं वनविभागातर्फे यावेळी सांगण्यात आले होते.

दरम्यान, या कारवाईसाठी गडावर 50 हून अधिक वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले होते. तसेच कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी सात वरिष्ठ पोलीस अधिकारी व 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा इथे ठेवला आहे.

उद्या पासून म्हणजेच, सोमवारपासून सिंहगड किल्ल्यावर (sinhagad fort) प्लास्टिक बंदी (plastic ban) अधिक कडक करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या आवरणात विकले जाणारे वेफर्स, नूडल्स यासारखे पदार्थ गडावर विकण्यास आणि नेण्यास मनाई असणार आहे.