पुणे : अनाथांची माय ( Mother of orphans) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे निधन (Died) झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील (Pune) गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) उपचार सुरु होते. उपचाराला प्रतिसाद देणे त्यांनी बंद केले होते.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील नवी पेठेतील ठोसरपागा येथील स्मशानभूमीत (Cemetery at Thosarpaga in Navi Peth) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Advertisement

पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ (Murlidhar Mohol), काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांच्यासह अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकानी सिंधूताई सकपाळ यांनी श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे.

हजारोंच्या उपस्थितीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई सकपाळ यांना अखेरची मानवंदना देण्यात आली आहे. मांजरी येथील सन्मती बाल निकेतन या आश्रमात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले होते.

Advertisement

वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी होती. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले होते.

सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांना अनाथांची माय म्हणून ओळखले जायचे. अनाथ मुलांना शिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याचे काम सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.

विविध संस्था स्थापन करून त्यांनी अनाथ मुलांना शिक्षण दिले आहे. युवतींना मोठे करून आर्थिक दृष्टया स्वावलंबी करून त्यांचे लग्नही त्यांनी लावली आहेत.

Advertisement

सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या संस्था

१ बाल निकेतन हडपसर, पुणे

२ सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा

Advertisement

३ अभिमान बाल भवन, वर्धा

४ गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)

५ ममता बाल सदन, सासवड

Advertisement

६ सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे