पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) प्रमुख आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक समजला जाणारा सिंहगड (sinhagad fort) हा महाराष्ट्रातील पुणे शहरापासून जवळ असलेला किल्ला आहे. पुणे (Pune) शहरापासून सुमारे 40 की.मी. अंतरावर नैऋत्य दिशेला सिंहगड किल्ला (sinhagad fort) असून या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखले जात असे. दरम्यान, हाच सिंहगड किल्ला आता मोकळा श्वास घेत असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर (sinhagad fort) सोमवारपासून प्लास्टिक बंदी (plastic ban) अधिक कडक करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या आवरणात विकले जाणारे वेफर्स, नूडल्स यासारखे पदार्थ गडावर विकण्यास आणि नेण्यास मनाई असणार आहे.

ही बंदीचं पालन न करणाऱ्यांकडून शंभर ते पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल, असं वन विभागाने म्हटलं आहे. नुकतंच या संदर्भातील बैठक पार पडली असून, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, किल्ले सिंहगडावरील (sinhagad fort) अतिक्रमण झालेल्या स्टाॅल्सवर वन विभागाने आज पहाटे कारवाई केली. त्यामुळे गेली कित्येक वर्षांपासून इथे व्यवसाय करणारे बेरोजगार झाले आहेत. शंभरहून अधिक स्टाॅल्स काढून टाकले आहेत.

गडावरील अतिक्रमण कारवाईसाठी 50 हून अधिक वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी सात वरिष्ठ पोलीस अधिकारी व 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा इथे ठेवला आहे.

खरंतर स्थानिक लोक पर्यटकांची सोय व्हावी म्हणून अनेक वर्षांपासून भजी, दही, चहाचा व्यवसाय करत आहेत. त्यांना आता जागा कुठे देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिंहगडावरील (sinhagad fort) खाद्यपदार्थ विक्रेते व इतर व्यावसायिकांना वन विभागाने बैठक घेऊन अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तीनच दिवस बैठकीनंतर वन विभागाने लगेच कारवाईचा बडगा उगारला आहे.

वन विभागाने अचानक कारवाई केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पहाटे पाच वाजताच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व पोलीस कारवाईसाठी आले होते.