पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) प्रमुख आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक समजला जाणारा सिंहगड (sinhagad fort) हा महाराष्ट्रातील पुणे शहरापासून जवळ असलेला किल्ला आहे. पुणे (Pune) शहरापासून सुमारे 40 की.मी. अंतरावर नैऋत्य दिशेला सिंहगड किल्ला (sinhagad fort) असून या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखले जात असे. दरम्यान, हाच सिंहगड किल्ला आता मोकळा श्वास घेत असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर (sinhagad fort) सोमवारपासून प्लास्टिक बंदी (plastic ban) अधिक कडक करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या आवरणात विकले जाणारे वेफर्स, नूडल्स यासारखे पदार्थ गडावर विकण्यास आणि नेण्यास मनाई असणार आहे.

ही बंदीचं पालन न करणाऱ्यांकडून शंभर ते पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल, असं वन विभागाने म्हटलं आहे. नुकतंच या संदर्भातील बैठक पार पडली असून, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच यापुढे किल्यावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात येणार असून किल्यावर जाण्यासाठी ई वाहनांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षण राहूल पाटील यांनी दिली.

सिंहगड किल्ले परिसराच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मंगळवारी स्थानिक नागरिक, संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.

पाटील म्हणाले, सिंहगड किल्ल्यावर पर्यटन वाढीसाठी येत्या काळात आमुलाग्र बदल केले जाणार आहे. किल्ल्याचं पावित्र्य जपण्यासाठी पुरातत्व खातं आणि वनविभाग मिळून काम करणार आहे.

सिंहगड पर्यटन विकास आरखड्यानुसार किल्ल्यावर यापुढे खाजगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. वाहनतळासाठी किल्ल्याच्या खाली काही एकरात सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे.

येथून किल्यावर जाण्यासाठी ई वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे गडाचं पावित्र्य जपण्यासाठी किल्यावर पूर्णपणे प्लॅस्टीक बंदी (plastic ban) केली जाणार आहे. प्लास्टिक घेऊन जाताना कुणी आढळ्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सिंहगड म्हणजे पुणेकरांचा (Pune) हक्काचा किल्ला आहे. त्यामुळे रोज शेकडो पुणेकर आणि बाहेर शहरातून पुणे दर्शनासाठी आलेले पर्यटक आवर्जून सिंहगडावर जातात.

गडावर मिळणाऱ्या पिठलं- भाकरी आणि कांदा भजींबरोबरच प्लास्टिकच्या आवरणातील पदार्थही मोठ्या प्रमाणात विकले जातात. अनेक लोक खास पिठलं-भाकरी खाण्यासाठी सिंहगडावर जातात.

मात्र आता या हौशी पर्यटकांना सिंहगडावर सोमवारपासून शिस्त बाळगावी लागणार आहे. गडावर सगळ्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे आणि येत्या सोमवारपासून प्लास्टिक (plastic ban) वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. असं देखील यावेळी सांगितलं.