ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

बोनेटवर बसून नवरी मंडपात

कोरोना काळात लग्नांत गर्दी जमवायला मनाई असली, तरी हाैसेला आणि वेगवेगळ्या संकल्पना लढवायला मनाई नाही.

हटके लग्न करून कायमस्वरुपी लक्षात राहील, यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयत्न सासवडच्या नववधूनं केला आहे.

नववधूचा हटके प्रयत्न

नवविवाहित जोडपी लग्नाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणताना दिसून येत आहेत. कोरोना काळात मर्यादित लोकांची परवानगी असल्याने आता जोडप्यांना हटके लग्न करण्याच्या पद्धती सुचत आहेत.

आपले लग्न आयुष्यभर अनेकांच्या लक्षात राहावे, यासाठी विमानात, समद्रकिनारी, निसर्गाच्या सानिध्यात, ग्रामीण भागात लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

बोनेटवरून वरात

लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील, असा पराक्रम भोसरीतील एका नव-या मुलीनं केला आहे. तिनं घरापासून लग्नमंडपापर्यंतच्या प्रवासात थेट गाडीच्या बोनेटवर बसण्याचं धाडस केलं.

पुण्यातील दिवे घाटात कायद्याची पायमल्ली करणारी घटना उघडकीस आली आहे. दिवे घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; मात्र हे प्रयत्न करत असताना काही अतिउत्साही जोडप्यांना कायद्याच्या धाकाचाही विसर पडल्याचं पाहण्यात येत आहे.

कायद्याचा विसर

सासवडजवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात आज या नवरी मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला; मात्र या उत्साही नवरी आणि तिच्या कुटुंबीयांना चक्क कायद्याचा धाकाचा विसर पडला आहे.

धोकादायक रीतीने प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आता पुणे पोलिस या नवरी मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर कायदेशीर कारवाई करतात का याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

नवरीने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीच्या बोनेटवर बसून मिरवत थेट दिवे घाटात मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला आहे.

You might also like
2 li