आज एकीकडे पुण्याचे नाव विविध क्षेत्रात वेगाने पुढे येत असतानाच दुसरीकडे मात्र त्याच पुण्यात गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे.

अनेक ठिकणी किरकोळ कारणावरून खून ,मारामारीच्या घटना रोज घडत आहेत. नुकतीच एक भाजीवाल्याला रस्त्यावर बसून धंदा का करतो असे म्हणत चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना हिंजवडी येथे घडली.

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका टोळक्यावर गुन्हा दखल केला. तर योगेश वसंतराव पोकळे असे मारहाण झालेल्या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. राजकुमार नागनाथ कोळी , अमरीश बाबू न्यावनुर आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोकळे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी पोकळे कोलते पाटील रोड वरून पायी चालत जात होते.

त्यावेळी आरोपी राजकुमार, त्याचा जावई अमरीश आणि अन्य दोघांनी फिर्यादी यांना अडवले. तू रस्त्यावर बसून धंदा का करतोस या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

Advertisement