कार्बन डायाॅक्साईड हा वायू प्राणघातक असतो, हे वारंवार सिद्ध झालं आहे. आता जनरेटरमधील कार्बन डायाॅक्साईड वायूची गळती होऊन, गुदमरल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात नववधू, आठ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

काय घडलं ?

चंद्रपूरमधील दूर्गापूर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या घरी ही घटना घडली. आज पहाटे प्रकार उघडकीस आला.

घरात असलेल्या जनरेटरमधील कार्बन डायाॅक्साइड वायूची अचानक गळती सुरू झाली, तेव्हा संपूर्ण कुटुंब झोपेत होते. वायूमुळे काही वेळातच गुदमरले जाऊन सातही जण बेशुद्ध पडले.

Advertisement

सकाळी उशिरापर्यंत लष्कर कुटुंबातील सदस्य घराबाहेर आले नाही. त्यामुळे शंका आल्याने आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

यांचा झाला मृत्यू

लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच सहा जणांचा मृत्यू झाला.

लष्कर कुटुंबातील एका महिलेवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वीच या कुटुंबात विवाह झाला होता.

Advertisement