Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

जिल्हाधिकारी असल्याचे सांगून साठ लाखांना गंडा

जिल्हाधिकारी कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने आपण जिल्हाधिकारी आणि तहसीलदार असल्याची बतावणी करत अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे.

याप्रकरणी पाच-सहा जणांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या महिलेनं आतापर्यंत जवळपास 50 ते 60 लाखांचा गंडा घातल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.

‘ही’ आहे बतावणी करणारी महिला

या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीनं महिलेचा तपास करत तिला बेड्या ठोकल्या आहेत. अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास, हडपसर पोलिस ठाण्याला कळवावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Advertisement

अनिता भिसे असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. ती येरवडा परिसरातील प्रतिकनगर येथील उत्तम टाऊन स्केप सोसायटीत भाडेकरू म्हणून राहते.

अपंगासाठी भूखंड देण्याच्या आमिषाने२८ लाखांची फसवणूक

आरोपी महिलेनं याच सोसायटीत राहणाऱ्या चित्तर दाम्पत्याची तब्बल 27 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

आरोपी महिलेनं अंपगासाठी भुखंड मिळवून देण्याच्या बहाण्यानं या दाम्पत्याला लुटलं आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित दाम्पत्यानं हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Advertisement

बनावट शिक्के आणि इतर बनावट कागदपत्रं

संबंधित महिलेच्या घराची झडती घेतली असता, तिच्या घरात अनेक बनावट साहित्य आढळून आलं आहे. यामध्ये बनावट शिक्के आणि इतर बनावट कागदपत्रं आढळली आहेत.

नोकरी लावण्यासाठी तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रंही पोलिसांनी जप्त केली आहेत. संबंधित महिलेनं आपण जिल्हाधिकारी आणि तहसीलदार असल्याची बतावणी करत पुण्यातील अनेकांना लुटलं असल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

Advertisement
Leave a comment