ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

सोन्याच्या दरात किंचित घसरण

गुरुवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.०५ टक्क्यांनी घसरले आणि १८०२.६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकन डॉलर नरमल्याने सराफा धातूचे दर स्थिर राहिले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्ये घट दिसून आल्याने सोन्याचे आकर्षण वाढले. तथापि, अमेरिकन अर्थव्यवस्थेत निरंतर सुधारणा होत असल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्यावर काहीसा परिणाम झाला. बाँडमधील कमी परताव्यामुळे पिवळ्या धातूचे दर या आठवड्यात वाढले. जास्त व्याजदरामुळे सोने धारण करण्याची संधी वाढते.

मागील महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीत मालमत्ता खरेदी अपेक्षेपेक्षा लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले. तरीही महागाईची वाढती चिंता आणि बेरोजगारीचे वाढते दर हे अमेरिकन मध्यवर्ती बँकांसाठी प्रमुख चिंतेचे कारण ठरले.

तथापि, विस्तार करण्याच्या कठोर धोरणाबद्दल काही संकेत न मिळाल्याने अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरीच्या उत्पन्नावर दबाव आला.

डेल्टा व्हेरिएंटच्या कोव्हिड रुग्णांमधील वाढ झाल्याने प्रमुख अर्थव्यवस्थांमधील लॉकडाऊनमध्येही वाढ होण्याची चिंता आहे. त्यामुळे आर्थिक सुधारणेला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल: काल डब्ल्यूटीआय क्रूड (कच्चे तेल)चे दर १ टक्क्यांनी वाढले व ७२.९ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तर एमसीएक्स क्रूडचे दर ०.६ टक्क्यांनी वाढले आणि ५४२३ रुपये प्रति बॅरलवर स्थिरावले.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या क्रूड साठ्यात बाजाराच्या ४ दशलक्ष बॅरल एवढ्या अपेक्षेपेक्षा घसरण होऊन ती आकडेवारी ६.९ दशलक्ष बॅरलवर घसरली. त्यामुळे कच्च्या तेलातील घसरण काहीशी सुधारली.

ओपेक समूहाने पुढील महिन्यांतील उत्पादनाच्या भूमिकेत स्पष्टता न दर्शवल्याने बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला. त्यामुळे कालच्या सत्रात तेलाचे दर दबावाखाली राहिले.

तेल समूहाचा लीडर सौदी अरेबिया आणि यूएईने करार करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर, वाढती जागतिक मागणी पुरवण्याकरिता बाजारात पुरवठा वाढवण्याचा करार करण्यास तेल निर्यातक समूह अपयशी ठरला.

तसेच, डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील कित्येक भागात वाढल्याने साथीवर नियंत्रण मिळवण्याचीही चिंता आहे. त्यामुळे तेलाच्या दरांवर आणखी दबाव आलेला दिसून आला.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, अमेरिकन तेल उत्पादन २०२१ मध्ये २१०,००० बॅरल प्रतिदिन म्हणजेच ११.१० दशलक्ष बीपीडी एवढ्यावर घसरण्याचा अंदाज आहे. पूर्वी हा अंदाज २३०,००० बीपीडी एवढा वर्तवण्यात आला होता.

You might also like
2 li