राज्य सरकारनं नुकताच एकविरा देवी आणि राजगडावर रोप वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका चिमुकलीनं या रोप वे ला विरोध केला आहे. त्यासाठी तिनं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना साकडं घातलं आहे.

ट्रेकर्स साईषाची बहादुरी

सह्याद्री अतिथीगृहावर आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत एकविरा देवी आणि राजगडावर बांधा, वापरा व हस्तांतरण करा या तत्वावर रोप वे निर्मितीच्या करारावर सह्या करण्यात आल्या.

पर्यटन विभागाकडून हा रोप वे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र हा रोपवे बांधू नये अशी मागणी एका चिमुकलीनं केली आहे. त्यासाठी तिनं थेट आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ही छोटी मुलगी गडप्रेमी आणि ट्रेकर असून साईषा अभिजीत धुमाळ असं तिचं नाव आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?

आदित्य दादा, राजगडावर रोप वे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका Please.

मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो.