शहरात सोमवारी दिवसभरात १३६ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दररोजच्या तुलनेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

मात्र शहरात दिवसभर नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान दिवसभरात २२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात कोरोनाबाधीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली तर पुण्याबाहेरील ११ जणांचा मृत्यु झाला आहे. सद्यस्थितीत ३५९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisement

पुण्यात एकूण ४ लाख ७५ हजार ९९० पॉझिटिव्ह रूग्णसंख्या आहे. तर २ हजार ४७० इतकी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या शहरात आहे. अद्यापपर्यंत ८ हजार ५३७ इतके एकूण मृत्यु झाले आहे.

तर ४ लाख ६४ हजार ९८३ इतक्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी ३ हजार ८७२ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

Advertisement