पुणे : भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यांनतर पुण्यात शिवसैनिकांकडून किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करत खाली पडले होते.
यांनतर भाजपच्या नेत्यांकडून पोलीस प्रशासन, संजय राऊत आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यांनतर किरीट सोमय्या यांचा पुण्यात सत्कार घेयचा असे भाजपने ठरवले होते.
भाजपकडून किरीट सोमय्यांचा त्याच पायऱ्यांवर सत्कार केला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर किरीट सोमय्यांना आज पुण्यात येण्याचे आमंत्रण देऊन सत्कारासाठी पुण्यात बोलावले होते.
पुणे (Pune) विमानतळावर किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका उद्धव ठाकरेंना दिला आहे का?
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी संजय राऊतांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केले असून कारवाई झाली पाहिजे.
मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन यांच्यावर कारवाई करा”.
“गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही. कारवाई कशी होत नाही, पाहतोच, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
“संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की मी लोकांचा जीव घेणार. बोगस कंपन्याकंडून कंत्राट घेणार, महाराष्ट्रातील लोकांची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असं वाटत असेल तर ते मूर्ख आहेत.
अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत. संजय राऊतांचे मित्र, परिवार, पार्टनर यांच्यावर कारवाई होणारच,” असेही किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.