Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

तर रक्त सांडण्यासाठी आमची तयारी

खेड तालुक्यामधील निघोजे परिसरातील शेतकऱ्यांनी एम. एस.आर. डी.सीच्या प्रस्तावित एकशे दहा मीटर रुंदीच्या चक्राकार रिंगरोडला अहिंसक मार्गाने तीव्र विरोध दर्शवला आहे.

या रिंगरोड बाबत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंदी केल्याने शेतकरी आक्रमक झाले असून आम्ही जमिनीची मोजणी करून देणार नाही,असा पवित्रा घेतला आहे.

एम. एस. आर. डी. सीच्या रिंगरोड संदर्भात निघोजे येथे बुधवारी (दि ९) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकरी खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण एम. एस. आर. डीचे अभियंते संदीप पाटील, तहसीलदार वैशाली वाघमारे, मंडल अधिकारी चेतन चासकर,

Advertisement

तलाठी दीपक ,बी.आर.जाधव, ग्रामविकास अधिकारी व्ही.एल.गाडीलकर,निघोजे गावातील सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच जितेंद्र आल्हाट, आशीष येळवंडे, ग्रामपंचायत सदस्यांसमवेत झालेल्या बैठकीत वरील गावांमधील शेतकऱ्यांनी एक मताने रिंगरोडला अहिंसक मार्गाने तीव्र विरोध केला आहे.

शेती हे शेतकऱ्यांचे उपजिविकेचे मुख्य साधन असून शेतजमिनी प्रकल्पांमध्ये जात आहेत. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत. आधीच भामा-आसखेड पुनर्वसनासाठी जमिनीवर शिक्के आहेत.

आता रिंगरोडला जमीन संपादन का करता ? रिंगरोडमुळे निघोजे गावातील सामान्य माणसाच्या समस्या सुटतील का? असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. मोई गावचे माजी सरपंच पाटील गवारे म्हणाले की, वेळप्रसंगी रक्त सांडण्यासाठी आमची तयारी आहे अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Advertisement
Leave a comment