मुंबई – अभिनेत्री ‘राधिका आपटे’ला (Radhika Apte) मीडियासमोर येणे फारसे आवडत नाही. बहुतेक अभिनेत्रींप्रमाणे ती सोशल मीडियावर कमी वेळ घालवते. राधिकाने (Radhika Apte) एका मुलाखतीत खुलासा केला की, तिच्याकडे तिच्या लग्नाचा एकही (wedding photos) फोटो नाही आणि तिने याचे एक विचित्र कारणही दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधिकाने (Radhika Apte) 2012 मध्ये ब्रिटिश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत काम करत असूनही हे जोडपे लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.

2011 मध्ये राधिका लंडनमध्ये डान्स शिकण्यासाठी होती तेव्हा त्यांची भेट झाली. ते लवकरच एकत्र राहू लागले. 2012 मध्ये लग्न झाल्यानंतर या जोडप्याने 2013 मध्ये एका सोहळ्याचे आयोजन केले होते.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना राधिकाने तिच्या लग्नाची (wedding) आठवण सांगितली आणि खुलासा केला की, “जेव्हा मी 10 वर्षांपूर्वी बेनेडिक्टशी लग्न केले तेव्हा आम्ही फोटो (wedding photos) काढायला विसरलो होतो.

आम्ही आमच्या मित्रांना बोलावले, स्वतःचे जेवण बनवले आणि इंग्लंडमध्ये एका ठिकाणी लग्न केले. पण, त्याचे एकही चित्र नाही, तर आमचे अर्धे मित्र छायाचित्रकार होते. त्यापैकी कोणीही फोटो काढले नाहीत.

आम्ही सर्व खूप मद्यधुंद होतो, त्यामुळे माझ्याकडे माझ्या लग्नाचे कोणतेही फोटो नाहीत जे एक प्रकारे पाहिले तर चांगले आहे.’

राधिका म्हणाली की, संस्मरणीय प्रसंगी चित्रे क्लिक करण्याच्या बाबतीत बेनेडिक्ट तिच्यापेक्षा वाईट आहे, परंतु आता ती हळूहळू स्वत: ला सुधारत आहे.

ती म्हणते, ‘माझे पती कोणतेही फोटो क्लिक करत नाहीत. परंतु, आता आम्ही सुट्टीवर जात आहोत, आम्ही कमीतकमी काही क्लिक करण्याचा प्रयत्न करतो. असं ती म्हणाली.