Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते !

काल अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते, असं शरद पवार यांनी धाडसत्राबाबत बोलताना स्पष्ट केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. त्यामध्ये अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली.

अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Advertisement

शरद पवार म्हणाले की, “काल अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते.” पुढे बोलताना ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनं येडी ठरवलं, असंही शरद पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “तुम्हाला आठवतंय का? विधानसभा निवडणुकांपूर्वी बँकेच्या एका प्रकरणाबाबत मला ईडीची नोटीस पाठवली.

त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेचं मी कधीही कर्ज आयुष्यात घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस आली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि संबंध महाराष्ट्राला भाजपनं येडी ठरवलं.

Advertisement

आपल्याला नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनं मतपेटीच्या माध्यमातून येडी ठरवलं.” तसेच पुढे बोलताना सत्तेचा गैरवापर करु नका, असा सल्लाही शरद पवारांनी भाजपला दिलाय. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन कारवाया करतंय, अशी टीकाही शरद पवार यांनी यावेळी बोलताना केलीये.

लखमीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर भाजप नेत्याच्या मुलानं गाडी चढवल्याचा प्रकार घडला. त्यावरूनही पवारांनी जोरदार टीका केली.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले.

Advertisement

तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील,

तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली होती.

Advertisement
Leave a comment